Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणजुन्नर तालुका शिक्षक समितीच्या वतीने कोविड योध्दा व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण...

जुन्नर तालुका शिक्षक समितीच्या वतीने कोविड योध्दा व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न


जुन्नर
 (पुणे) : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून चांगले काम केलेल्या अधिकारी पदाधिकारी शिक्षक यांना कोविड योध्दा व तालुक्यात ऑनलाइन व ऑफलाईन मध्ये चांगले काम केलेल्या शिक्षक शिक्षिकांंना ‘शिक्षक समिती’च्या वतीने शिक्षक समिती गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

शिक्षक सोसायटीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, गटशिक्षणाधिकारी के, बी, खोडदे आणि गटशिक्षणाधिकारी कोकतरे, विस्तार अधिकारी अनिता शिंदे, शिक्षक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लांघी, सरचिटणीस राजेश दुरगुडे आणि समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी शिक्षक बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष बाळासाहेब लांघी यांनी केले तर आभार महिला अध्यक्षा श्रीमती जिजा साबळे यांनी व्यक्त केले. 

तसेच यावेळी शिक्षक समिती दिनदर्शिका 2021 चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आशाताईंनी शिक्षक समितीच्या कार्याचे कौतुक केले. कोविड योद्धेच्या वतीने चंद्रकांत डोके व गुणवंत शिक्षक पुरस्कार अर्थीच्या वतीने वतीने जयसिंग मोजाड यांनी मनोगत व्यक्त केले.

न्यायाची चाड ! व अन्यायाची चीड ! या प्रमाणे शिक्षक समिती राज्याभरात काम करते. शिक्षक समितीच्या कामाचे आशाताईंनी कौतुक केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय