पुणे : राज्य सरकारकडून घरपोच मद्य विक्री करण्याबाबतचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्याबाबत राज्य सरकारच्या वतीने आदेश देण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्णय
कोरोना काळात लॉकडाऊन लावण्यात आले होते. लॉकडाऊन काळात सर्वच उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने देखील बंद होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. दारू विक्रेत्यांना दारू विक्रीसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र दारूच्या दुकानांपुढे गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. दारू खरेदीसाठी मद्यपींनी रांगा लावल्या होत्या. गर्दी वाढल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य सरकारने जे दारू विक्रेते अधिकृत परवानाधारक आहेत, त्यांना घरपोहोच दारू विक्री करण्याची परवानगी दिली होती.
NEET नीट परीक्षेचा निकाल जाहीर !
आरोग्य : पहिल्यांदा सेक्स करताना या 8 गोष्टी ठरतील लाभदायक !
HQ दक्षिणी कमांड पुणे येथे विविध पदांसाठी भरती, 10 वी, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी !
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 129 पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख