Thursday, April 25, 2024
HomeNewsगव्हाचा तुटवडा असतानाही तुर्कीस्तानने गहु स्वीकारण्यास दिला नकार, वाचा या मागचे कारण

गव्हाचा तुटवडा असतानाही तुर्कीस्तानने गहु स्वीकारण्यास दिला नकार, वाचा या मागचे कारण

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गव्हाचे मोठे उत्पादक आहेत. हे दोन्ही देश जगातील एकूण गव्हाच्या 29 टक्के पुरवठा करतात. परंतू गेल्या काही महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. जवळपास चार महिने उलटून गेले तरी अद्याप युद्ध थांबलेले नाही. या युध्दाचा परिणाम अनेक गोष्टीवर होत असून जगभरात अन्न संकट निर्माण होतं आहे. अशा परिस्थितीत भारताने तुर्कीस्तानला पाठवलेल्या गव्हाची खेप स्वीकारण्यास तुर्की प्रशासनाने नकार दिला आहे. 

भारतीय व्यापाऱ्यांनी पाठवलेल्या गव्हात फायटोसॅनिटरी असल्याची तक्रार तुर्की अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे हा गहु स्वीकारण्यास तुर्की प्रशासनाने नकार दिला आहे. गव्हाच्या या खेपात 15 दशलक्ष टन गहू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे २९ मे रोजी गव्हाची खेप घेऊन तुर्कस्तानला पोहोचलेल्या जहाजाला परतावे लागले आहे. आता हे जहाज तुर्कीहून गुजरातच्या कांडला बंदराकडे परत निघाले आहे. एवढ्या मोठ्या गव्हाची खेप परत मागे पाठवल्याने भारतातील व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

HQ दक्षिणी कमांड पुणे येथे विविध पदांसाठी भरती, 10 वी, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी !

गव्हाच्या शेतात रुबेला नावाचा रोग आढळून आला होता, भारतीय वनस्पतींमध्ये रुबेला रोग ही गंभीर समस्या असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे तुर्कीच्या प्रशासनाने हा गहु घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत भारताच्या कृषीमंत्र्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

एप्रिलमध्ये महागाई वाढल्यानंतर भारत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर काही देशांनी भारताकडे मदत मागितली, गहू निर्यातबंदीनंतर भारताने इजिप्तला 60 हजार टन गहू पाठवला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 129 पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय