Thursday, May 9, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडNo Zigzag:हायकोर्टाची डॉक्टरांना तंबी,औषधांची प्रिस्क्रिप्शन कॅपिटल अक्षरात लिहून देण्याचे आदेश

No Zigzag:हायकोर्टाची डॉक्टरांना तंबी,औषधांची प्रिस्क्रिप्शन कॅपिटल अक्षरात लिहून देण्याचे आदेश

भुवनेश्वर:आता डॉक्टरांना आता चिठ्ठी लिहिताना स्पष्ट आणि सुवाच्य हस्ताक्षरात किंवा कॅपिटल अक्षरात लिहावी लागतील.किंवा ती टाइप करून द्यावी लागतील, राज्यातील सर्व डॉक्टर, खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना यापुढे सर्व प्रिस्क्रिप्शन, पोस्टमार्टम अहवाल आणि वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रे स्पष्ट आणि सुवाच्य हस्तलिखितात किंवा मोठ्या अक्षरात लिहिण्याचे निर्देश ओडिशा हायकोर्टाने दिले आहेत.

ओडिशाच्या देनकाल जिल्ह्यातील
हिंदोळ येथील रहिवासी रासनंदा भोई याचा मुलगा सौवग्या याचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता.त्यावेळी प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेली अक्षरे दुर्बोध व शाईत मुंगळा बुडवून कागदावर उमटवलेली होती,त्यावरून त्याने ओडिशा उच्च न्यायालयात अर्ज करून स्पष्ट अक्षरात डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन लिहून देण्याची विनंती केली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना
न्यायमूर्ती एसके पाणिग्रही यांनी स्पष्ट म्हटले आहे की,डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहिताना दुर्बोध,झिग-झॅग’ अक्षरात औषधे लिहून दिली व ती केमिस्टला समजली नाही तर चुकीचे औषध दिले जाऊ शकते,अनेक डॉक्टर्स काही गरज नसताना अशा पद्धतीने पोस्ट मार्टेमचे रिपोर्ट पण लिहीत असतील तर त्याचा विपरीत परिणाम मेडिको लीगल कागदपत्रांवर होऊ शकतो.डॉक्टर्स जे लिहितात ते सर्वांना नीट वाचता आलेच पाहिजे,असे आदेश ओडिशा राज्याच्या हायकोर्टाचे न्यायमूर्ती एसके पाणिग्रही
यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत,तसेच आदेशाची प्रत सर्व वैद्यकीय केंद्रे, खाजगी दवाखाने आणि वैद्यकीय महाविद्यालयांना पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.


राज्यातील सर्व डॉक्टर, खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना यापुढे सर्व प्रिस्क्रिप्शन, पोस्टमार्टम अहवाल आणि वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रे स्पष्ट आणि सुवाच्य हस्तलिखितात किंवा मोठ्या अक्षरातच लिहावे लागणार आहे.

या आदेशानुसार डॉक्टरांना आता कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावी लागणार आहेत,आता डॉक्टरांना आता चिठ्ठी लिहिताना स्पष्ट आणि सुवाच्य हस्ताक्षरात लिहिण्याची खबरदारी घेतली नाही,तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ शकेल,असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय