Monday, May 20, 2024
Homeराज्यस्वतः चा बिझनेस सुरू करायचाय? सरकारच्या 'या' योजना ठरतील फायदेशीर

स्वतः चा बिझनेस सुरू करायचाय? सरकारच्या ‘या’ योजना ठरतील फायदेशीर

सरकार तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देते.यासाठी सरकारने काही योजना राबवल्या आहेत. या योजनांच्या मदतीने तरुणांना स्टार्ट अप सुरु करण्यास मदत होईल.

क्रेडिट गॅरंटी स्कीम

क्रेडिट गॅरंटी स्कीम (CGSS)अंतर्गत सरकार स्टार्टअप कंपन्याना १० कोटीपर्यंतचे कर्ज देतात. या योजनेअंतर्गत, सरकार व्यापारी बँका, नॉन बँकीग फायनान्स कंपन्याकडून घेणाऱ्या कर्जावर गॅरंटी देते. ही गॅरंटी स्टार्टअपसाठी दिली जाते. १० कोटी रुपयांच्या कर्जावर ही हमी दिली जाईल. या योजनेअंतर्गत स्टार्टअप कंपन्याना कर्ज उपलब्ध असेल.

प्रधानमंत्री मुद्रा योजना


पंतप्रधान मोदींनी क्रेडिट गॅरंटी स्कीम (PMMY) योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत लघू उद्योगांना, स्टार्टअपला १० लाखांपर्यंतचे कर्ज दिले दाते. व्यापारी बँका, आरबीआय, MFI आणि NBFC द्वारे हे कर्ज दिले जाते.

स्टार्ट-अप इंडिया योजना


खेड्यापाड्यातील महिला आणि SC/ST उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचे तारण न ठेवता १० लाख ते १ कोटीपर्यंतचे कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करताना पहिले ३ वर्ष आयकर सूट मिळते.

राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ योजना

मार्केटिंग, टेक्नोलॉजी, फायनान्स याांना सपोर्ट करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. लघु उद्योग, स्टार्टला प्रोत्साहन देणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला दोन प्रकारचे कर्ज दिले जाते.

विपणन सहाय्य योजना

जर तुम्ही तुमचे बाजारातील स्थान वाढवायचे असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वापरु शकतात. यामुळेच व्यवसायाची जाहिरात, मार्केटिंग वाढवण्यास मदत होते.

क्रेडिट सहाय्य योजना

या योजनेअंतर्गत तुम्ही कच्चा माल खरेदी, मार्केटिंग यासाठी आर्थिक सहाय्य मिळवू शकता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय