Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडडाॅ. दाभोलकरांच्या स्मृतींना आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इचलकरंजी...

डाॅ. दाभोलकरांच्या स्मृतींना आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इचलकरंजी शाखेच्या वतीने निर्भय माॅर्निंग वाॅक!

इचलकरंजी : शहीद डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला 20 ऑगस्ट रोजी 9 वर्षे पूर्ण होतायत. डाॅ. दाभोलकरांच्या स्मृतींना आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इचलकरंजी शाखेच्या वतीने निर्भय माॅर्निंग वाॅक केला.
डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनांचे मारेकरी सापडले असले तरी अद्याप त्यांना शिक्षा झालेली नाही. काॅ. गोविंद पानसरे, डाॅ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या विचारवंतांच्या खूनाचा तपासही खूप संथ गतीने सुरू आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी व त्याच्याही पुढे जाऊन विवेकी पद्धतीने विचार मांडणाऱ्या विचारवंतांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पोषक वातावरण समाजात राहिले पाहिजे. या उद्देशाने हा माॅर्निंग वाॅक घेतला गेला.
शहरातील छ. शिवाजी पुतळा ते जनता चौक ते प्रांत कार्यालय चौक ते पुन्हा छ. शिवाजी पुतळा असा माॅर्निंग वाॅकचा मार्ग होता. बजरंग लोणारी, सुनिल स्वामी, युसुफ तासगावे, रोहित दळवी आदि कार्यकर्त्यांनी यावेळी भावना व्यक केल्या. यावेळी महा. अंनिस सह शहरातील विविध परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते, सक्रिय कार्यकर्ते तसेच अन्य नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय