Sunday, May 19, 2024
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेवर निसर्गाचा कोप; चक्रीवादळामुळे मोठा विध्वंस, २३ जणांचा मृत्यू

अमेरिकेवर निसर्गाचा कोप; चक्रीवादळामुळे मोठा विध्वंस, २३ जणांचा मृत्यू

अमेरिका: एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या दक्षिण-पूर्वेकडील मिसिसिपी राज्यात शुक्रवारी मोठं वादळ धडकलं. वादळामुळे शहरात मोठा विध्वंस होत २३ जणांचा मृत्यू झाला आहे.मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मिसिसिपी राज्यामध्ये या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
या वादळाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अमेरिकेत आलेल्या या जोरदार चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर इमारती कोसळल्या आहेत. रस्त्यावर जागोजागी झाडे उन्मळून पडली आहेत. वादळासह या ठिकाणी मोठ मोठ्या गारांचा पाऊस देखील झाला. या दुर्घटनेत इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे गाडली गेली आहेत. तसेच अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

या दुर्घटनेतून बचाव झालेल्या व्यक्तींवर देखील पुढील आयुष्य जगण्यासाठी मोठे आव्हान उभे आहे. कारण तेथील अनेक व्यक्तींना सध्या राहण्यासाठी घर नाही तसेच दोन वेळच्या जेवनाचाही मोठा प्रश्न उभा आहे.

अशात राष्ट्रपती बाइडन यांनी या संकटाबाबत सांगताना म्हटलं आहे की, ‘एकूण किती टक्के नुकसान झाले आहे हे अताच सांगणे कठीण आहे. अमेरिकेवर आलेल्या या संकटामुळे सर्व नागिकांसाठी माझ्या मनात दु:खद भावना आहे. वादळामुळे अनेकांची घरे आणि व्यवसाय देखील मोडकळून पडलेत. या सर्व नागरिकांना आम्ही मदद करू.’ असा विश्वास त्यांनी यावेळी दिला आहे.

सध्या अमेरिकेत बचावकार्य सुरू झाले आहे. ढिगाऱ्याखाली गेलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यामध्ये मृतांचा आकडा सतत वाढताना दिसतो आहे. तसेत परिसरात रोगराइ पसरण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय