Thursday, November 21, 2024
Homeक्रीडाविश्वनताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

Natasha Stankovic : क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोविक यांच्या घटस्फोटानंतरही त्यांच्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. सोशल मीडियावर या दोघांची फॅन फॉलोइंग असल्याने त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांचं लक्ष असतं. काही दिवसांपूर्वी नताशा मुलगा अगस्त्यला कायमचं सर्बियाला घेऊन जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, एका मुलाखतीत नताशाने यावर खुलासा केला आहे.

नताशा म्हणाली, “माझं सर्बियाला जाणं शक्यच नाही. मला एक मुलगा आहे, जो इथे शाळेत शिकतो. हार्दिक, अगस्त्य आणि मी अजूनही एक कुटुंब आहोत. मुलामुळे आम्ही कायमच एक कुटुंब असणार आहोत. इथे मला आता दहा वर्षे झाली आहेत आणि दरवर्षी जुलै महिन्यात सर्बियाला जात असते.”

नताशाने पुढे सांगितले; “आयुष्यात काहीही घडलं तरी मी लोकांवरचा विश्वास हरवलेला नाही. कधी-कधी परिस्थितीमुळे माणसं भरकटतात, पण वाईट नसतात.काही परिस्थितीत मी शांत बसायचे, मी फार काही बोलायचे नाही, मला फरक पडत नाही असं मी स्वत:ला म्हणायचे. पण अगस्त्यमुळे मी स्वत:वर प्रेम करायला शिकले असंही नताशाने सांगितलं.

कामाबाबत विचारलं असता, तिने सांगितलं की, “मी गेल्या पाच वर्षांत कोणतंही काम केलं नाही. पण याबाबत मला कोणतीच खंत नाही. माझ्या मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणं फायद्याचं ठरलं असतं,असं नताशाने सांगितलं.

हार्दिकसोबतच्या नात्याविषयीही ती म्हणाली, “आमच्यातील नात्याबाबत खासगीपणा जपायला मला आवडेल.”

Natasha Stankovic

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार

राज्यात थंडीचा जोर वाढणार ; हवामान विभागाने दिला इशारा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

अमित शाह यांचं शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान; समर्थ रामदासांचा उल्लेख करत गुलामीचा उल्लेख

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर

चार दिवसात सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल ; भाजपच्या ‘या’ नेत्याची घोषणा

संबंधित लेख

लोकप्रिय