Friday, November 22, 2024
Homeग्रामीणनाशिक सुरत ३५० की.मी चे अंतर १७६ किलोमीटर वर. चेन्नई सुरत सहापदरी...

नाशिक सुरत ३५० की.मी चे अंतर १७६ किलोमीटर वर. चेन्नई सुरत सहापदरी महामार्ग नाशिक च्या सहा तालुक्यातून जाणार.

                                        

नाशिक : चेन्नई सुरत सहापदरी महामार्ग 1600 की. मी चा रस्ता 1250 किलोमीटर होणार असून हा रस्ता नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, नाशिक निफाड सिन्नर या तालुक्यातून जाणार असून नाशिक ते सुरत अंतर हे 176 की .मी येणार असल्याची माहिती नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. सद्यस्थितीत हा मार्ग सुरत मुंबई पुणे सातारा कोल्हापूर बेळगाव चित्रदुर्ग बंगरुळ चेन्नई असा आहे. 

हा मार्ग ग्रीन फिल्ड अंतर्गत सुरत नाशिक नगर कर्नाळा सोलापूर कर्नल कडप्पा चेन्नई असा तयार करण्यात येणार  आहे. यामुळे सुरत ते नाशिक 350 किलोमीटरचे अंतर हे 176 किलोमीटर वर होईल.

नाशिक जिल्ह्यातून जवळपास 122 किलोमीटर चा महामार्ग 69 गावामधून जाणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय