Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणबोरगाव कणसरा चौकात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा रास्ता रोको

बोरगाव कणसरा चौकात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा रास्ता रोको

बोरगाव (नाशिक) : भाजपच्या केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार कायद्याच्या विरोधात 26 नोव्हेंबर रोजी माजी आमदार जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखालील बोरगाव येथे रास्ता आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी आमदार जे. पी. गावीत म्हणाले की, मोदी सरकारने शेतकरी – कामगार यांच्या विरोधी कायदे करुन आपल्या शेतकरी, कामगार, मजूर यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहे. याचा प्रखर विरोध जनतेला करावा लागेल. कोरोना रोखण्यासाठी हे शासन अपयशी ठरल्याने देशातील सबंध नागरिकांची मोठी नुकसान केली आहे.

वनाधिकार कायदा झाला आहे. तरी ही वनजमिन धारक आदिवासी जनतेला वर्षानुवर्ष वंचित ठेवले आहे. अवकाळी पावसाने शेतीची मोठे नुकसान झाली त्याची भरपाई मिळावी, गरिब जनतेला खावटी अनुदान मंजूर करुन तात्काळ द्यावे, प्रत्येक कुटुंबाला जॉब कार्ड देऊन मागेल त्याला काम द्यावे, शेतकऱ्यांच्या सहमतीने धरणांचे व्यवस्थापन करावे, शेतकरी, बगायतदार यांची लाईट बिले जास्त देऊन मोठ्या संकटात टाकले आहे. ही वाढीव बिले रद्द केली पाहीजे. “ड” यादीतील सर्व गरजू लाभधारक कुटुंबांना सर्रास घरे देण्यात यावे. वंचित राहिलेल्या गरजू लोकांना “ड” यादीत समाविस्ट करा. शबरी आवास योजना लाभार्थ्यांना लाभ द्या, धरणे बांधून घरे गावे बडवून गरिब आदीवासी जनतेला विस्थपित करु नये. नाशिक जिल्ह्यातील 154 गावे सेन्सिटिव्ह झोन मधे टाकून गरिब जनतेवर मोठा अन्याय केला आहे. गरिब निराधार वृध्द व्यक्तींंना 2 हजार 500 रुपये पर्यंत वाढीव पेंशन द्या, पीक ला हमिभाव द्यावे, या मागण्यांंना घेऊन आपल्याला लढावे लागेल, असे ही गावित म्हणाले.

यावेळी मुंबई हल्यात शहीद झालेल्या शहीद जवानांंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माकपचे सेक्रेटरी सुभाष चौधरी, जनार्दन भोये, तुळशीराम खोटरे उपस्थितांना संबोधित केले.

या रास्ता आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI), जनवादी महिला संघटना, आशा वर्कर्स, कामगार संघटना, शेतकरी संघटना, बांधकाम संघटना, बैंक कर्मचारी, शिक्षक संघटना व इतर अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. 

यावेळी सभापती मनिषा महाले, पुंडलिक भोये, संदीप भोये, अशोक भोये, भरत भोये, खंडू भोये, बाळा भोये, यशवंत पवार, हरी कडाळी, सोमनाथ दळवी, भगवान गांगुर्डे, हिरा गवित, खुशाल शिंदे, बयाजी धुळे, डिगु भोये, लक्ष्मण बोरसे, मधू जोपले, आनंदा भोय, कृष्णा गायकवाड, धर्मा पवार, मनोहर गायकवाड, सोमनाथ गवळी, रंगनाथ पवार, डी. गवळी, पुनाजी गवळी, भिमा पाटील, सुरेश गवळी, राहुल आहेर, विजया घांगळे, दनियल गांगुर्डे, वसंत बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय