Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणनाशिक : सुरगाणा येथे शिवसेना महिला आघाडीचा मेळावा संपन्न

नाशिक : सुरगाणा येथे शिवसेना महिला आघाडीचा मेळावा संपन्न

नाशिक (पंडित भोगे): कळवण – सुरगाणा मतदारसंघातील शिवसेना महिला आघाडीचा संयुक्त मेळावा सुरगाणा येथे संपन्न झाल. यावेळी दिंडोरी लोकसभा महिला संपर्कप्रमुख डॉ.स्नेहल मांडे यांचे अध्यक्षतेखाली आरटीओ चेक नाका, घागबारी येथे संपन्न झाला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर, ठाकरे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. अशी जनतेची भावना झाली आहे. याच मुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आदेशाने राज्यातील महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या महिला संपर्कप्रमुख विधानसभानिहाय दौरा केला जात आहे, असे मत डॉ.स्नेहल मांडे यांनी व्यक्त केले. 

यावेळी तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे म्हणाले, आपल्या सुरगाणा तालुक्यातील जिव्हाळ्याचा प्रश्न पाणी व आरोग्य याविषयी सविस्तर विषयाची मांडणी करुन हे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात येतील असे आश्वासन दिले.

यावेळी महिला आघाडी तालुका संघटक सुशिला चौधरी, जिल्हा संघटक मंगलाताई भास्कर, कळवण तालुका महिला संघटक प्रितीताई मेणे, सुरगाणा शहर संघटक सिमा परदेशी, युवासेना जिल्हा अधिकारी आदित्य केळकर, उपजिल्हाप्रमुख योगेश वार्डे, ललित आहेर, एकनाथ भोये, सुष्मा गांगुर्डे, लहाणी धुळे, योगीता गावीत, संगीता गायकवाड, विठा गांगुर्डे, सिंधु जाधव, प्रभा वाघ, अरुणा पवार, वैशाली धुळे, जया गांगुर्डे, नर्मदा धुळे, यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय