Tuesday, May 7, 2024
Homeताज्या बातम्याNashik : आशांना न्याय मिळाला, गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणार –...

Nashik : आशांना न्याय मिळाला, गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणार – खा.हेमंत गोडसे

नाशिक : महाराष्ट्र शासनाने ७८ हजार आशांना ५ हजार रूपये वाढ दिली आहे. आशा व गटप्रवर्तक संघटना ने सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे. या संप काळात मला आशा व गटप्रवर्तक लढ्यात योगदान देता आले. याचे समाधान आहे. गटप्रवर्तकांना सुद्धा मोबदला वाढ शासनाने योग्य पद्धतीने दिली पाहिजे. आशांपेक्षा अधिक दिली पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेल, माझा सत्कार केल्या बद्दल आभारी आहे. गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देईल असे आश्वासन खा.हेमंत गोडसे यांनी हुतात्मा स्मारक नाशिक येथे आयटक मनपा आशा मेळाव्यात केले. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना आयटक राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले अध्यक्षस्थानी होते. (Nashik)

भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक (Nashik) जिल्हा सचिव कॉ. महादेव खुडे यांनी आशा व गटप्रवर्तक लढा लढणाऱ्या चे अभिनंदन केले. लाल बावटा आयटक आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन लढा लढून न्याय मिळवून देईल. एकजूट ठेवा अभिनंदन केले. कॉ.राजू देसले यांनी आपली मागणी सातत्याने गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत आहेत. याबद्दल अभिनंदन केले.

याप्रसंगी आशाताई कांचन पवार, संगीता सूरूनंगे, गायत्री खत्री, मंगल अहिरे यांनी आंदोलन अनुभव कथन केले.

कॉ.राजू देसले यांनी आशा व गटप्रवर्तक लढा यशस्वी आशा व गटप्रवर्तक एकजूट मुळे झाला आहे. आशांना ५ हजार रूपये मोबदला वाढ निर्णय जाहीर झाल्याबद्दल सरकारचे आभार, खा. हेमंत गोडसे यांनी आशा व गटप्रवर्तक मागण्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाठपुरावा केला या बद्दल आभारी आहोत. गटप्रवर्तक उच्च शिक्षित आहेत. आशांपेक्षा अधिक मोबदला वाढ निर्णय सरकारने करावा. व गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्यावा यासाठी खा.गोडसे यांनी मदत करावी असे साकडे घातले. (Nashik)

याप्रसंगी खा. गोडसे यांचा शाल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विचार मंच वर प्रा. सोमनाथ मुठाल, संजय करंजकर, निशिकांत पगारे, महादेव खुडे, प्राजक्ता कापडणे, मीना जाधव होत्या. मनपा आशा नमिता गोंधने, फरिदा शेख, अर्चना पवार, शिला शिरसाट आदि उपस्थित होत्या. आभार प्राजक्ता कापडणे यांनी मानले.

whatsapp link

हे ही वाचा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय