Wednesday, May 22, 2024
HomeNewsनरहरी महाराज पुण्यतिथी आळंदीत साजरी

नरहरी महाराज पुण्यतिथी आळंदीत साजरी

आळंदी/अर्जुन मेदनकर: येथील मयुरेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी परंपरेने धार्मिक उपक्रम, दिपप्रज्वलन, पुष्पहार करीत पुष्पांजली अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी श्रींची आरती झाली.

या वेळी मयुरेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मयूर पेठकर, शेतकरी बचाव आंदोलन महा. राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब पेठकर, प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक विजय बिडकर, विनायक पितळे, जनार्दन पितळे, उद्योजक श्याम हातेकर, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सामाजिक कार्यकर्त्या कार्यकर्त्या उज्वला पेठकर, शिवसेना शहराध्यक्ष संगिता फपाळ, विश्वस्त ज्ञानेश्वर घुंडरे, सुजित काशिद, बालाजी टाक, रवींद्र नायर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थि मान्यवरांनी मनोगते व्यक्त करीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन मयूर पेठकर यांनी केले.



येथील श्रीकृष्ण मंदिर बिडकर वाडा येथे नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आळी. या निमित्त शहरात दुचाकी वाहन रॅलीचे आयोजन उत्सहात झाले. श्रीकृष्ण मंदिरात श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत परंपरेने साजरी करण्यात आली. पुण्यतिथी निमित्त दीपप्रज्वलन पोपट बेदरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्रीकृष्ण मंदिरात सरदार हरप्रीतसिंह बिडकर, उमेश बिडकर, राजेंद्र शहाणे, अनंत बेदरे, चंद्रकांत टाक, शरद पळसे, विनायक बेलापूरकर आदी उपस्थित होते. शहरातून नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त दुचाकी रॅली चे आयोजन उत्साहात करण्यात आले. श्रीकृष्ण मंदिरात बिडकर वाडा येथे पंडित महामुनी यांचे कीर्तन हरिनाम गजरात झाले. यावेळी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. उमेश बिडकर यांनी उपक्रमाचे संयोजन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय