Wednesday, May 22, 2024
HomeNewsखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक; स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंचा दबदबा

खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक; स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंचा दबदबा

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले.

महाराष्ट्राने आता ३८ सुवर्ण, ३४ रौप्य आणि ३१ कांस्यपदके मिळवत १०३ पदकांसह आघाडी कायम राखली आहे. हरियाना, मध्य प्रदेश यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सीखेच कायम आहे. हरियाना (२५, २०, १८) अशा ६३ पदकांसह दुसऱ्या, तर मध्य प्रदेश (२५, १३, २३) अशा ६१ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्राला बुधवारी जलतरण आणि सायकलिंगच्या सुवर्णपदकांनी बाजू भक्कम करता आली. अपेक्षा फर्नांडिसने जलतरणात, तर पूजा दानोळेने सायकलिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक साजरी केली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय