Sunday, May 19, 2024
Homeजिल्हास्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षी स्वातंत्र्य सैनिकांची नावे चौक, रस्त्यांना द्या - भारतीय...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षी स्वातंत्र्य सैनिकांची नावे चौक, रस्त्यांना द्या – भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

नाशिक : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षी स्वातंत्र्य सैनिकांची नावे चौक, रस्त्यांना द्या, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या स्वातंत्र्य ला 75 वर्ष अमृतमहोत्सवी वर्ष आहे. ह्या निमित्ताने केंद्र व राज्य सरकारने स्वातंत्र्य सैनिक चा गौरव करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या नावाने राहत असलेल्या ठिकाणी पाट्या लावणे, रस्त्याला, चौकाला नाव देणे, कमान उभारणे आदी उपक्रम सांगितले आहे. स्वातंत्र्य सैनिक ज्या ठिकाणी राहत असतील त्या मार्गाला, चौक ला नाव द्या. त्यांच्या कार्याची माहिती असलेले फलक लावण्यात यावे. शाळा, महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य चळवळ वर व्याख्यान आयोजित करण्यात यावी. स्वातंत्र्य सैनिक चा सन्मान आयोजित करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी भाकपचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, शहर सचिव कॉ. महादेव खुडे, कैलास मोरे, तातेराव थोरात, विराज देवांग, पूनमचंद शिंदे, बाळू दोंदे, निवृत्ती कसबे आदींसह उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय