Saturday, May 11, 2024
Homeजिल्हामुखेड : मोहनावती नदीमधील मुरमाचा ढिगाऱ्या तात्काळ काढा - DYFI

मुखेड : मोहनावती नदीमधील मुरमाचा ढिगाऱ्या तात्काळ काढा – DYFI

मुखेड (नांदेड) : मोहनावती नदीमधील मुरमाचा ढिगाऱ्या तात्काळ काढण्यात यावे, अशी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष अंकुश माचेवाड, सामाजिक कार्यकर्ते आदी बनसोडे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कौठारोड वरील मोहनवती मोतीनाल्याच्या डाव्या बाजूस नगराध्यक्ष बाबुसावकर देबड़वार यांच्या विहिरी लगत असलेला मोठा मुरमाचा ढिगारा तात्काळ काडून टाकण्यात यावा. नाहीतर मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी अतिवृष्टी झालीतर नदीतून वाहणारे पाणी त्या ढिगाऱ्याला लागून वस्तीत शिरून अनेक लोकांचे मागच्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान व जीवित हानी होऊ शकते.

त्यामुळे ते तात्काळ काढून गल्लीतील नागरिकांना सहकार्य करावे. मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकारी विपीन इटनर पाहणी करण्यासाठी आले असता त्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ढिगारा काढून टाकण्याचे सूचना केली होती. पण आजपर्यंत कोणत्याही प्रकारची नगर पालिकेच्या वतीने कार्यवाही करण्यात आली नाही, असेही डीवायएफआय ने म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय