Friday, May 10, 2024
Homeग्रामीणग्रामसेविकेचा अजब कारभार; आम्ही सुचवलेल्या ठिकाणी कामावर या नाहीतर गुन्हे दाखल होतील,...

ग्रामसेविकेचा अजब कारभार; आम्ही सुचवलेल्या ठिकाणी कामावर या नाहीतर गुन्हे दाखल होतील, मजूरांची फसवणूक.

प्रतिनिधी :- आम्ही सुचवलेल्या ठिकाणी कामावर या नाहीतर गुन्हे दाखल होतील, असे सांगून मजुरांची फसवणूक करण्याचा अजब कारभार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आपटी गावात घडला आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या या फसवणूकीचा निषेध केला आहे.

           पुणे जिल्हा परिषदेच्या मनरेगा विशेष मोहिमेअंतर्गत आपटी गावातील ७० मजुरांनी ऑनलाइन काम मागणीचे अर्ज केले होते. तसेच ४ किलोमीटरचा डोंगर पायी उतरून ग्रामपंचायत गंगापूर येथे जाऊन सरपंच, उपसरपंच व ग्रामसेविक यांची भेट घेऊन आम्हाला गावातच काम उपलब्ध करून द्या अशी मागणी मजूरांनी केली होती. त्यावर त्यांनी काम उपलब्ध करून देऊ असं सांगितलं होते.             मात्र काही दिवसांनी विठ्ठलवाडी,गंगापुर म्हणजे खेतेपठारच्या वनक्षेत्रात समतल चर खोदण्याचं काम सुचवलं जे आपटी या गावापासून जवळपास ७-८ किलोमीटर अंतरावर असून त्या ठिकाणी पोहचण्यासाठी एक डोंगर उतरून दुसरा डोंगर चढून जावे लागणार होते व ते मजुरांना शक्य नसल्याने मजुरांनी या कामाला येण्यास नकार दिला.

            त्यावर गंगापुर खु|| ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका नंदकर यांनी तुम्ही कामाची मागणी केली आहे, आता उपलब्ध असलेल्या कामावर नाही आलात तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील. त्यापेक्षा आता कामाची आवश्यकता नाही असं लेखी द्या, अशी भिती दाखवुन मजुरांकडुन “सध्यस्थीतीत आम्हाला कामाची आवश्यकता नाही” अशा आशयाच्या अर्जावर सह्या घेतल्या आहेत. 

         रोजगाराची नितांत गरज असताना मजूरांची फसवणूक केली आहे. लोकांच्या तोंडचा घास हिसकावून घेणाऱ्या ग्रामसेविकेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आपटी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय