Friday, May 10, 2024
Homeआंतरराष्ट्रीयचे ग्वेरा की याद में फिदेल कास्रो

चे ग्वेरा की याद में फिदेल कास्रो

             (चे ग्वेरा यांच्या आठवणीत फिदेल कास्रो यांनी दिलेल्या भाषणांचा हा संग्रह आहे. चे ग्वेरा यांचे जीवन काय होते, ते कसे जगले याचा धावता आणि यथोचित आढावा भाषणांंतून घेतला आहे. )       

             अर्जेंटिनामध्ये जन्मलेला चे. वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर लँटिन अमेरिकेची यात्रा करतो. ग्वाटेमाला मध्ये सीआईए प्रणित भाडेचे सैनिक जेव्हा उघडपणे कत्तली करतात. हे पाहून चे पेटून उठतो, बैचेन होतो. त्यानंतर चे मेक्सिको मध्ये पळून जातो. मेक्सिकोमध्ये क्युबाई क्रांतिकारकांची भेट होते. गुरिल्ला अभियानाची सहमती दर्शवून तो त्यामध्ये सहभागी होतो. येथेच त्यांची फिडेल यांची भेट होते. बतिस्ताचे शोषणकारी, दमनकारी शासन उलथवून टाकण्यासाठी ग्रान्मा या जहाजाने ते क्युबाच्या ओरियेन्ते प्रांतात पोहोचतात. तेथे त्यांच्यावर अचानक झालेला हल्ला आणि सियेरा माएस्रा या पर्वतात बतिस्ता सैनिकांसोबत झालेली लढाईचे कमी शब्दांंत फिडेल यांनी मांडलेले आहे. 

              क्युबाच्या विजयात चे यांचे योगदान हे महत्वपूर्ण आहे, हे फिडेल मांडतात. जेव्हा चे क्युबा सोडून जातो, त्यावेळी प्रसारमाध्यमांमध्ये फिडेल आणि चे यांच्यामध्ये वाद झाल्याचे वर्णन करणाऱ्या बातम्या छापतात. त्यास फिडेल यांनी दिलेले उत्तर या पुस्तकात दिलेले आहे. बोलिवियाच्या जंगलात जेव्हा चे ला जखमी अवस्थेत असताना कैद केले जाते आणि त्यांनतर त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना गोळ्या घातल्या जाता. त्याला का गोळ्या घातल्या जातात? याचे विश्लेषण या पुस्तकात केले आहे.

             चे क्युबात जन्मलेला नसला, तरी आपल्या सर्वोच्च त्यागामुळे, कर्तृत्वामुळे क्युबाचे नागरिक झाले. जनतेला ते प्रिय होते. म्हणून तर त्यांच्या प्रती कृतज्ञाता व्यक्त करण्यासाठी १८ आक्टोबर १९६७ हवाना येथे रिवोल्यूशन प्लाझा येथे १० लाख लोक सहभागी झाले होते. चे क्युबाच्या उद्योग विभाग आणि राष्ट्रीय भूमी सुधारणा संस्थेचे प्रमुख होते. ते नेशनल बैंक ऑफ क्युबाचे अध्यक्ष होते. 

         फिडेल म्हणतात,  ‘जनसमूहामध्ये खोटी आशा कायम ठेवून भांडवलदारी त्याचा फायदा घेत असतात.’ फिडेल पुढे म्हणतात, ‘ तो सन्मानासाठी जगला नाही, तो मानवतेसाठी जगला.’

           चे डॉक्टर होते, पण ते क्रांतिकारक डॉक्टर होते, ते अर्थशास्त्रज्ञ होते, ते कार्यकर्ता होते, ते एक प्रशासकीय कार्यकर्ता होते, एक चिकित्सक बुद्धिजीवी होते, ते मानवतेला उच्च मानणारे सर्वोच्च व्यक्तिमत्त्व होते. म्हणूनच चे आपल्या जखमी सहकाऱ्यासोबतच शत्रूच्या सैनिकांना सुध्दा पण उपचार करत असत.

          चे म्हणायचे, ‘समाजवाद आणि साम्यवाद आणणे म्हणजे फक्त संपत्तीचे उत्पादन आणि वितरण करे नाही, तर शिक्षण आणि चैतन्य महत्वाचे आहे.’ असे फिडेल सांगतात.

           फिडेल म्हणतात, ‘कोणत्याही व्यक्तीने केवळ काही विशिष्ट विचारांनी स्वत: ला सिध्द करण्यासाठी अभ्यास करावे असे नाही, तर इतरांकडे पाहावे, त्यांचे विश्लेषण केले पाहिजे आणि त्याबद्दल विचार करावेत असे मला वाटते.’ ९ आक्टोबर १९६७ रोजी चे ग्वेरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची हत्या केली गेली. त्याचे देह गुपचूप दफन करण्यात आले. परंतू चे बदल असलेले प्रेम, आपुलकी कमी झालेली नाही आणि होणार नाही, हे पुस्तक वाचताना जाणवते. १७ आक्टोबर १९९७ रोजी त्यांचे अवशेष शोधून क्युबा मध्ये आणले गेले. सान्ता क्लारा येथे त्यांंचे स्मारक आहे.

           समाजवाद, मानवतावाद आणि आंतरराष्ट्रीयवादावर असलेली अटळ निष्ठा, निस्वार्थी, स्वच्छ मनोवृत्ती यामुळे चे अजरामर झाला. तो जगाच्या कानाकोपऱ्यात गुंजणाऱ्या अन्यायाविरोधातील आवाजात नेहमी जिंवत आहे. पुस्तक वाचताना क्युबाच्या वाटचाली बरोबर महान क्रांतिकारक चे यांच्या आठवणीत फिडेल कास्रो यांनी दिलेली भाषणे नक्कीच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत. सर्वांनी हे पुस्तक नक्की वाचावे.

? पुस्तकाचे नावचे ग्वेरा की याद में फिदेल कास्रो

? अनुवाददिगम्बर

पृष्ठ संख्या१०७

? प्रकाशकगार्गी प्रकाशन, दिल्ली

किंमत –  ६० रूपये.

नवनाथ मोरे

9921976460

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय