Friday, May 10, 2024
Homeग्रामीणलॉकडाऊनमुळे मिळेना काम...किसान सभेच्या पुढाकाराने शासकीय योजनेतून अनेकांच्या हाताला मिळाले काम...!

लॉकडाऊनमुळे मिळेना काम…किसान सभेच्या पुढाकाराने शासकीय योजनेतून अनेकांच्या हाताला मिळाले काम…!

प्रतिनिधी :- अखिल भारतीय किसान सभेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतूूून लोकांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे.

          आंबेगाव तालुक्यात शिनोली(ठाकरवस्ती) व जांभोरी या दोन गावात मनरेगा अंतर्गत काम सुरू झाली आहेत. याबद्दल किसान सभा आंबेगाव तालुका समितीने जिल्हा परिषद व तालुका प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

          लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही, अशा काळात मदतीचा हात मिळाला आहे. परंतु अनेक मजुरांना कामावर येण्याची इच्छा असूनही जॉबकार्ड नसल्याने मजुरांना कामावर घेतले गेले नाही, याबद्दल प्रशासनाने घेतलेल्या चुकीच्या भूमिकेविषयी किसान सभेने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय