पुणे : जगातील सर्वात प्रसिद्ध जहाजांपैकी एक असलेलं टायटॅनिक पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. रविवारी पाच व्यक्ती सिफर्ट टायटन नावाच्या पाणबुडीतून अटलांटिक महासागरात बुडालेल्या या जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, ही पाणबुडी आता बेपत्ता झाली आहे. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न केले जात आहेत. कारण, पाणबुडीत अवघे 2 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. हाच ऑक्सिजन पाणबुडीतील व्यक्ती श्वासोच्छवासासाठी वापरत आहेत.
बचावकर्त्यांसमोर हे सर्वात मोठं आव्हान आहे. बेपत्ता पाणबुडीतील पाच जणांमध्ये ब्रिटिश अब्जाधीश हमिश हार्डिंग, पाकिस्तानी टायकून शहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा यांचा समावेश आहे. त्यामुळे या घटनेला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं आहे. 10 हजार 432 किलो वजन असलेल्या या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी बहुराष्ट्रीय ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.
या ऑपरेशनअंतर्गत, यूएस कोस्ट गार्ड, कॅनडाची लष्करी विमानं, फ्रेंच जहाजं आणि टेलीगाइड रोबो इत्यादी टायटॅनिकच्या अवशेषांकडे जात असताना बेपत्ता झालेल्या पाणबुडीचा शोध घेत आहेत. यूएस कोस्ट गार्डच्या म्हणण्यानुसार, पाणबुडीतील व्यक्तींकडे आता 2 तासांपेक्षा कमी ऑक्सिजन शिल्लक आहे. त्यामुळे बचावकर्ते 24 तास काम करत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत 96 तासांपर्यंत ऑक्सिजन पुरवठा होईल, अशी टायटनची रचना करण्यात आलेली आहे.
जागतिक योग दिनानिमित्त रहाटणीत योग शिबिर संपन्न
पिंपरी विधानसभा मतदार संघात भाजपची जोरदार तयारी
ग.दि. माडगुळकर नाट्यगृहात सेवा सुविधांचा अभाव..