Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी विधानसभा मतदार संघात भाजपची जोरदार तयारी

पिंपरी विधानसभा मतदार संघात भाजपची जोरदार तयारी

६० हजार घरात जनसंपर्क मोहीम, अमित गोरखे यांची पत्रकार परिषदेत माहिती

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.२१
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने यशस्वीरीत्या नऊ पूर्ण झालेली आहेत. सुशासन व गरीब कल्याण योजनेअंतर्गत विविध कामे केली आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने झालेली विकास कामे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी घर घर चलो अभियान पिंपरी विधानसभा मतदारसंघात सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी पिंपरी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. पिंपरी विधानसभेतील ३९९ बूथ वर सर्व परिसरात भाजपची सर्व प्रचार संघटन यंत्रणा व कार्यकर्ते घरोघरी जाऊन मोदी सरकारची गेली ९ वर्षात झालेली कामे पोहचवण्यासाठी विशेष अभियान राबवत आहेत, नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे साधा भाजीवाला सुद्धा आता कॅशलेस व्यवहार करू लागला आहे. आवास योजने अंतर्गत गरिबांना घरे व मुद्रा लोनमूळे सामान्य व्यावसायिकांना मोठा आर्थिक दिलासा केंद्रसरकारने दिला आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघातील ६० हजार घरात घर चलो अभियान राबवण्यात येणार आहे, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. अमित गोरखे यांनी सांगितले.


या अभियानातून जनसंवादद्वारे नागरिकांच्या


समस्यांची नोंद घेतली जाणार आहे, प्रलंबित कामे गतिमान व्हावी यासाठी प्रशासकीय अधिकारी व शासन यांच्या मदतीने प्रयन्त केले जातील,सेवा, सुशासन व गरीब कल्याण हेतू असलेल्या भाजपा संघटन द्वारे विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांची नोंद घेणार आहेत, असे आमदार उमा खापरे यांनी सांगितले. येणाऱ्या काळात पिंपरी विधानसभेतील भाजपाचे आजी माजी सर्व नगरसेवक, आघाडी मोर्चा पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते सर्व संघटीत होऊन केंद्र व राज्य सरकारच्या लोक कल्याणकारी योजना जनते पर्यंत पोचवण्याचे काम करणार आहेत, तसेच जनता व सरकार मधला दुवा होउन विकास कामांना गती देण्याचे काम करतील अशी माहिती प्रदेश कार्यकारी सदस्य सदाशिव खाडे यांनी दिली.

मोदी@९ उपक्रमा अंतर्गत पिंपरी विधानसभा परिसरात व्यापारी संमेलन, सोशल मिडिया बैठक, जागतिक योग दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच २३ जून रोजी डॉ शामा प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बलिदान दिवस, जेष्ठ नागरिक संमेलन विषयी नियोजन सुरु आहे . परिसरातील प्रबुद्ध व्यक्तींचे संमेलन २५ जून रोजी आयोजित केले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी पिंपरी विधानसभा भाजपा विधानसभा प्रभारी वर्षा डहाळे,निमंत्रित सदस्य राजेश पिल्ले, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे, सरचिटणीस राजू दुर्गे, माजी उप महापौर नानी ( हिराबाई ) गोवर्धन घुले, महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे, नगरसेवक केशव घोळवे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, माउली थोरात, शितल शिंदे, शैलेश मोरे, मंडल अध्यक्ष विजय शिनकर , महेंद्र बाविस्कर व इतर पदाधिकारी उपस्थितीत होते.

महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये


Video : सिक्कीममध्ये भयंकर भूस्खलन झाल्याने रस्ते बंद, जवानांकडून ३५०० पर्यटकांची सुटका



ब्रेकिंग न्यूज : MPSC मध्ये राज्यात तिसरी, पण मित्रासोबत फिरायला गेली अन् घात झाला ; वाचून हादराल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय