Saturday, October 1, 2022
Homeग्रामीणटिटवी गावात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

टिटवी गावात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

अकोले : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यांमधील टिटवी गावात नोकरदार वर्गाकडून दहावी, बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी 30 विद्यार्थ्यांना फोल्डर फाईल, पेन, फुल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला, तरुण तसेच जिल्हा परिषद शाळा टिटवी, व सोकेवाडी चे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाला शाळा तसेच ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन आदर्श शिक्षक युवराज तळपे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी नोकरदार वर्गामार्फत निवृत्त बँक अधिकारी रवि मुंढे व नाशिक पोलीस रविराज भांगरे प्रयत्न केले. तसेच सर्व नोकरदार वर्गाने आर्थिक योगदान देत कार्यक्रम यशस्वी केला.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय