Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमावळ : पवना धरण परिसरातील नागरिकांना दक्षतेचा इशारा

मावळ : पवना धरण परिसरातील नागरिकांना दक्षतेचा इशारा

मावळ / क्रांतिकुमार कडुलकर : पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे की पवना धरण 100% टक्के क्षमतेने भरलेले आहे. तरी विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी मध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी सकाळी 9:30 वाजता 800 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे. सदर विसर्ग 12:00 वाजता वाढवून 800 क्यूसेक्स वरून 1400 क्यूसेक्स करण्यात येणार आहे. Residents of Pavana Dam area are cautioned

तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता कधीही पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. 

तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे, असे पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय