Thursday, July 18, 2024
Homeजिल्हामावळ : वीटभट्टी कामगारांना शिधा वाटप

मावळ : वीटभट्टी कामगारांना शिधा वाटप

मावळ : बेबडओहोळ येथील वीटभट्टी कामगारांना श्रीनिवास ऑटो कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी शिधा वाटप केले.

पावसामुळे नुकसान झालेल्या कामगारांना मदतीचा एक हात देत माणूसकीचे दर्शन घडवले.

या कामात कंपनीचे प्लांट हेड प्रकाश मुसंडे व त्यांचे सहकारी कामगार यांनी सहभाग घेतला. सुनील वाघमारे, तुकाराम गराडे, विनोद ढमाले, वसंत पाटील, दत्ता तोळसे व टाटा मोटर्सचे वासुदेव काळसेकर यावेळी उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय