Saturday, October 12, 2024
Homeराज्यसीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

सीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

उटी : तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात सीडीएस बिपिन रावत देखील उपस्थित होते. आतापर्यंत तीन जवानांना वाचवण्यात यश आले असल्याचे देखील सांगण्यात आले होते. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांचा मृत्यू झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांची पत्नीही होती. तर 3 जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत होते. या सर्वांना उपचारासाठी वेलिंग्टन तळावर घेऊन जाण्यात आले होते. तर चौथ्या व्यक्तीचा शोध सुरु होता.

या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

संरक्षण खात्याने या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे अधिकारी सीडीएस बिपीन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग, गुरुसेवक सिंग, जितेंद्र कुमार, विवेक कुमार, बी. साई तेजा, हवालदार सतपाल आगाची भडका उडाला अन् झाडांनी पेट घेतला बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. 

वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचं महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचं लेक्चर होतं. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जायचं होतं. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. हे हेलिकॉप्टर एमआय-सीरिजचं असल्याचं सांगितलं जातं. 

MI-17, V-5 या सीरिजचं हे हेलिकॉप्टर होतं. बिपीन रावत यांच्यासोबत काही अधिकारी आणि कर्मचारीही होते. 

■ कोण आहेत बिपीन रावत? 

डिसेंबर 2019 मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्यापदावर काम करण्यासाठी संधी दिली होती. 16 मार्च 1958 मध्ये बिपीन रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एल. एस. रावत सैन्यात होते. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत म्हणून त्यांची ख्याती होती. बिपीन रावत यांचं बालपण सैनिकांच्या सहवासातच गेलं. 

शिमल्याच्या सेंट एवडर्ड स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांचा परफॉर्मन्स पाहून त्यांना SWORD OF HONOUR ने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजातून पदवीचं शिक्षण घेतलं होत.


संबंधित लेख

लोकप्रिय