Sunday, May 12, 2024
Homeग्रामीणधम्मज्योती बुद्धविहार तांदूळवाडी येथे माता रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

धम्मज्योती बुद्धविहार तांदूळवाडी येथे माता रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

तांदुळवाडी (प्रतिनिधी रत्नदीप सरोदे ): धम्मज्योती बुद्धविहार प्रबुद्धनगर तांदुळवाडी येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२६ व्या जयंती महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन स्थानिक नगरसेविका ज्योती सरोदे ,भारत सरोदे व ज्येष्ठ व्यक्ती शिवाजी सरोदे ,वाल्मीक सरोदे, हनुमंत सरोदे, विश्वास पानसरे ,गौतम भालेराव ,अरुण कांबळे , महादेव सरोदे,अजिनाथ सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले.



मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवांसह सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. बुद्धवंदने नंतर सामुदायिक स्नेहभोजन करण्यात आले व त्यानंतर उपस्थित लहान मुलांनी माता रमाई ,भारतीय संविधान या विषयावर सुंदर मनोगते व्यक्त केली . माही सागर जगताप या मुलीने माता रमाई यांच्यावरील गीत गायले. या सर्वांना गायनाच्या कार्यक्रमादरम्यान बक्षीस वितरण करण्यात आले.



जयंती महोत्सवानिमित्त पुण्यशील लोंढे प्रस्तुत सम्राट गायन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायक पुण्यशील लोंढे व गायक गरुडा गुळीक यांच्या सुमधुर आवाजाने उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले. गायनाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित समाज बांधवांचे प्रबोधन केले व माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मनोगत ॲड.योगेश सरोदे यांनी केले. धम्मज्योती बुद्धविहार मध्ये जयंतीनिमित्त जीवन सरोदे व अक्षय भोसले यांनी सुंदर रांगोळी काढली. ऋषिकेश सरोदे यांनी स्टेज डेकोरेशनची सुंदर व्यवस्था केली.



या कार्यक्रमासाठी करण पानसरे, विजय कांबळे ,ऋषिकेश भोसले ,जय कांबळे ,गौतम सरोदे ,भीमराव सरोदे ,आकाश सरोदे ,सोनू शिंदे ,सुनील पानसरे ,साहिल सरोदे ,रोहन जगताप, चेतन कांबळे ,सुरज सरोदे, रितेश सरोदे ,दर्शन सरोदे ,रोहित शिंदे, ऋषिकेश सरोदे ,अमोल डावरे ,तेजस सरोदे ,रत्नदीप सरोदे, अविष्कार सरोदे, तुषार सरोदे, रोहन शिंदे ,अक्षय शिंदे ,बंटी सरोदे, वरून झोडगे, हर्ष सरोदे ,देविदास सरोदे , अनुश सरोदे ,अक्षय काकडे, प्रफुल सरोदे इत्यादी तरुणांचे कार्यक्रमासाठी विशेष योगदान लाभले. या कार्यक्रमासाठी तांदुळवाडी आणि आसपासच्या परिसरामधील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय