Friday, May 17, 2024
Homeआंतरराष्ट्रीयBreaking news:इराण मध्ये भीषण बॉम्बस्फोट, 103 लोकांचा मृत्यू,170 हून अधिक जखमी

Breaking news:इराण मध्ये भीषण बॉम्बस्फोट, 103 लोकांचा मृत्यू,170 हून अधिक जखमी

तेहेरान:इराणच्या केरमन शहरात बुधवारी (3 जानेवारी) दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात तब्बल 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 170 हून अधिक लोक यात जखमी झाले आहेत.

इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कबरीजवळ दोन मोठे स्फोट झाले. चार वर्षांपूर्वी 3 जानेवारी 2020 रोजी बगदादमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी मारला गेला होता. इराणच्या सरकारी माध्यमांनी सांगितले की वर्धापन दिनादरम्यान केरमन शहरातील साहेब अल-जमान मशिदीजवळ एक समारंभ होत होता. यावेळी दोन मोठे स्फोट झाले.


इराणच्या मध्यवर्ती भागात असलेल्या केरमन प्रांतात १५ मिनिटांच्या आत अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले होते. मात्र हे स्फोट दहशतवादी हल्ल्यामुळे झाले की गॅस स्फोटामुळे हे अद्याप स्पष्ट नाही, असं ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.हे हल्ले इस्राईलने घडवून आणले आहेत असे इराणचा आरोप आहे,असे सूत्रांकडून समजते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय