Friday, April 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएस.एम.जोशी कॉलेजमध्ये मराठी भाषा पंधरवडानिमित्त काव्यसंमेलन व पत्रकार गौरव समारंभ 

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये मराठी भाषा पंधरवडानिमित्त काव्यसंमेलन व पत्रकार गौरव समारंभ 

हडपसर /डॉ. अतुल चौरे : समाजाला डोळसपणे पाहून जर काव्य लिहिले तर ते समाज म्हणाला आवडते.कवीची ओळख ही त्याच्या वैचारिक भूमिकेतून व्हायला हवी.आम्ही चळवळीच्या प्रदेशातील कवी आहोत. त्यामुळेच आमच्या कवितेत वैचारिकता दिसून येते. जिथे श्वास थांबतो तिथे कवितेची ओळ थांबते.जिथे विचार संपतो तिथे कविता संपते, असे सुप्रसिद्ध कवी संतोष पवार यांनीं सांगितले. 

त्यांच्या गांधीला टाळून, माहेराला माती होती, माती जन्माची सोबती, बाईपणाच्या जातीला घोर लागले शाप ! दूध तिचेच पिऊन कसे बनतात साप इत्यादी त्यांच्या कवितांना रसिकांनी दाद दिली. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मराठी विभाग व मास कम्युनिकेशन अँड  जर्नालिझम, वैश्विक कला पर्यावरण आयोजित, मराठी भाषा पंधरवडानिमित्त काव्य संमेलन व पत्रकार गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. एस.

 गायकवाड होते. 

समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकारांनी करावे. महाराष्ट्रात पत्रकारांची फार मोठी गौरवशाली परंपरा आहे. आज माध्यमांमध्ये खूप बदल होत आहेत. या बदलातूनही जे चांगले आहे ते स्वीकारूया. रविशकुमार सारखे पत्रकार आजही लोकांना आवडतात. साहित्य आणि समाज यांचे नाते अतूट आहे. सामाजिक बांधिलकी कवी लेखकांनी जोपासली पाहिजे. त्यातूनच नवा आणि चांगला समाज निर्माण होईल, असा विचार त्यांनी व्यक्त केला. 

पत्रकारांच्या वतीने प्रमोद गिरी यांनी आजच्या पत्रकारितेवर विचार व्यक्त केले. याप्रसंगी प्रमोद गिरी- दै.पुढारी, रागिणी सोनावणे – रोखठोक महाराष्ट्र, अमित मेहंदळे – दै. हडपसर एक्स्प्रेस, अशोक बालगुडे – दै.सकाळ, अनिल वाव्हाळ इत्यादी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. मराठी विभाग व मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागाचे प्रमुख प्रो.डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अतुल चौरे यांनी केला. या काव्य संमेलनात अनेक विद्यार्थी कवी सहभागी झाले होते. मराठी भाषा पंधरवडानिमित्त माझी माय मराठी व माझी मराठी स्वाक्षरी हा उपक्रम राबवण्यात आला. तसेच निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाला उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य  डॉ. संजय जगताप व उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे, ज्युनिअर विभागप्रमुख प्रा. तृप्ती हंबीर, विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. 

सूत्रसंचालन डॉ. नम्रता कदम यांनी केले. आभार प्रा.  धीरेंद्र गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शुभम तांगडे, डॉ. संदीप वाकडे, प्रा. पूनम तडके तसेच मराठी विभाग व मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातील सर्व प्राध्यापकांनी प्रयत्न केले.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय