मंचर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय आंबेगाव तालुका समितीच्या नेतृत्वाखाली आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, मंचर (Manchar ) येथील मुलांनी वसतिगृहाच्या मुलांनी सोमवारी (दि.११ ) ला वसतिगृहाच्या विविध समस्यांना घेऊन बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली होती.
या होत्या प्रमुख मागण्या :
१. आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह, मंचर येथील विद्यार्थ्यांच्या मुलभूत समस्या यामध्ये कचरा व्यस्थापन,पाण्याची टाक्यांची स्वच्छता, संगणक कक्ष, अभ्यासिका कक्ष इ. व इतर समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात.
२. शैक्षणिक वर्ष २०२२ -२०२३ व २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षाची थकीत स्वयंम ची डीबीटी, भारत सरकार शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना त्वरित वितरीत करण्यात यावी.
३. चालू शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वयंम डीबीटी अदा करण्यात यावी.
४. आपल्या कार्यालयाचे महाविद्यालयांनी आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देते वेळी कोणत्याच प्रकारचे शैक्षणिक शुल्क आकारू नये असे परिपत्रक असताना, महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी घेत आहेत. तरी आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर महाविद्यालयांना निर्देश देण्यात यावे.
या मागण्या त्वरित सोडविण्यात याव्यात यासाठी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरु होते. सायंकाळी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांसोबत सकारात्मक चर्चा केली. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजया पंढूरे यांनी विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन देत मागण्या सोडविण्यात येतील असे सांगितले आहे. (Manchar )
यावेळी एसएफआय चे पुणे जिल्हा अध्यक्ष दिपक वालकोळी, कोषाध्यक्ष बाळकृष्ण गवारी, आंबेगाव तालुका अध्यक्ष रोहिदास फलके, तालुका कोषाध्यक्ष रोषण पेकारी, यश गभाले, मयूर हिले, प्रवीण डामसे आदी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
हे ही वाचा :
भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की
ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश
अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मान्यता, “हे” असणार नवे नाव…
ब्रेकिंग : आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ
मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले २७ महत्वाचे निर्णय
जुन्नर : घाटघर येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा