Wednesday, November 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMahesh Landge : महेश लांडगे यांची राज्यात हॅट्रिक'; 63 हजार...

Mahesh Landge : महेश लांडगे यांची राज्यात हॅट्रिक’; 63 हजार 634 मतांनी विजयी; तिसऱ्यांदा आमदार!

सूज्ञ पिंपरी-चिंचवडकरांचे त्रिवार आभार…! (Mahesh Landge)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : देव-देश अन्‌ धर्माभिमान जागृत ठेऊन महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या निमित्ताने सूज्ञ पिंपरी-चिंचवडकरांनी तिसऱ्यांदा आपले प्रतिनिधीत्व भोसरी विधानसभा सभागृहात करण्याची संधी दिली. याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो.असे महेश लांडगे यांनी म्हटले आहे. (Mahesh Landge)

विधानसभा निवडणुकीची ‘हॅट्रिक’ करण्यासाठी गेल्या चार-पाच महिन्यांपासून अविरत कष्ट करणारे माझे सर्व सहकारी, भाजपा परिवार आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी, हिंतचिंतक यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कदापि तडा जावू देणार, असा ‘शब्द’ देतो. असे महेश लांडगे यांनी अभिवचन दिले आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघामधून आमदार महेश लांडगे यांनी हॅट्रिक केली आहे. महेश लांडगे यांनी सलग तिसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान मिळवला आहे. महेश लांडगे यांच्यासमोर महाविकास आघाडीने मोठे आव्हान दिले होते, भोसरी विधानसभा मतदारसंघात तुतारी आवाज घुमणार असे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पुन्हा एकदा मतदारांनी महेश लांडगे यांना विजयी केले आहे.

दांडगा जनसंपर्क आणि मजबूत बूथ यंत्रणा, कार्पोरेट दर्जाचे मायक्रो मॅनेजमेंट यशस्वी ठरले आहे.

महेश लांडगे विजय झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिले आहेत, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, उद्योजक, सह सोसायट्या मतदार संघातील सोसायट्यांचे सदस्य यांनी महेश लांडगे यांना साथ दिली.

तसेच समाविष्ट गावातील रस्ते, विकासाचे प्रकल्प (संतपीठ, न्यायालय इमारती,बायो डायवर सिटी पार्क, संविधान भवन आदी) यशस्वी प्रकल्प इत्यादी कामामुळे भोसरी विधानसभा परिसरातील शहरी भागातील मध्यम वर्गाने मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. विशेषतः दोन महापौर राहुल जाधव आणि नितीन काळजे सह आजी माजी नगरसेवकांनी संपूर्ण मतदार संघात उत्कृष्ठ टीम वर्क केले.

महेश लांडगे यांना विजयी करण्यासाठी महायुती मधील सर्व पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम केले. स्वतः महेश लांडगे यांनी महाविकास आघाडीचे मोठे आव्हान असताना सुसंकृत, साविधनिक भाषेत प्रचार केला. त्यांचे व्हिजन डाक्युमेंट प्रत्येक घरात गेले. भोसरी विधान सभा मतदार संघातील केलेली कामे आधुनिक शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ठरली आहेत. (Mahesh Landge)

प्रतिक्रिया:

पिंपरी-चिंचवडकरांचा निरंतर विश्वास, भोसरी मतदार संघाचा आता शाश्वत विकास..! अजेय भारत… अजेय भाजपा… अजेय महायुती…! माझा विजय जनतेला समर्पित करत आहे.

– आमदार महेश लांडगे, भोसरी विधानसभा

हे ही वाचा :

NFC न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स भरती, आजच अर्ज करा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हीच कष्टकऱ्यांची इच्छा : बाबा कांबळे

पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला; बसमधील 38 जणांचा मृत्यू, 20 पेक्षा जास्त जण जखमी

Tarkarli beach : तारकर्ली एक नयनरम्य पिकनिक स्पॉट (Video)

संबंधित लेख

लोकप्रिय