Monday, December 9, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडShankar jagtap : विजय ऐक्याचा..विक्रमी; मताधिक्याचा..! शंकर जगताप तब्बल १ लाखांनी विजयी

Shankar jagtap : विजय ऐक्याचा..विक्रमी; मताधिक्याचा..! शंकर जगताप तब्बल १ लाखांनी विजयी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिंचवडमध्ये तिरंगी लढत झाली असून महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला आहे. चिंचवड विधानसभेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक त्यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांनी लढवली, त्या आमदार झाल्या. लोकसभा निवडणुकी नंतर पक्षाने निर्णय घेत आणि आश्विनी जगताप यांनी माघार घेतल्यानंतर शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली. (Shankar jagtap)

दुसरीकडे राहुल कलाटे आणि शंकर जगताप यांच्या सामना बघायला मिळेल असेच स्पष्ट चित्र राहिले. लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात राहुल कलाटे यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती. मुळात चिंचवड विधानसभेत गावकी भावकीचे वर्चस्व आहे. तरीही शंकर जगताप हे प्रचारामध्ये पुढे होते.

मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शंकर जगताप आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अखेर चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार शंकर जगताप हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांचा पराभव केला आहे.

जगताप यांच्या विजयानिमित्त थेरगाव परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे. डीजेचा दणदणाट करून जल्लोष साजरा केला आहे.विजय घोडदौड सुरू असतानाच दीड वाजल्यापासून कार्यकर्त्यांची मतदान मोजणी केंद्रावर गर्दी होऊ लागले. कार्यकर्त्यांनी जय श्रीराम म्हणत जल्लोष केला. (Shankar jagtap)

सूक्ष्म नियोजन (Micro management), सक्षम बूथ यंत्रणा, कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत दिवसाचे सुमारे १४ तास जनसंपर्क तसेच आयटी कर्मचारी सह सर्व स्तरावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शंकर जगताप यांना आमदार केले आहे.

माजी विरोधी पक्षनेते नाना काटे किंग मेकर

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसह इतर लोककल्याणकारी योजना लागू केल्या. योजनांची आक्रमक अंमलबजावणी आणि जोरदार प्रचार तसेच शंकर जगताप यांनी स्वतःचा जाहीरनामा स्पष्टपणे सोशल मीडियावर प्रसारित केला.

जगताप यांनी पिंपळे गुरव, जुनी सांगवी, पिंपळे सौदागर या भागामध्ये, तर कलाटे यांचे वर्चस्व असलेल्या वाकड, पुनावळे परिसर, थेरगावच्या काही भागांत आणि भाऊसाहेब भोईर यांचे वर्चस्व असलेल्या चिंचवडगाव, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी मध्ये पायाला भिंगरी लावून दांडगा जनसंपर्क शंकर जगताप यांनी ठेवला होता.

काळेवाडी, रहाटणी, रावेत, किवळे या भागांत शंकर जगताप यांच्या टीमने प्रभावी काम केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) लोकप्रिय युवा नेते माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी यांनी महायुतीच्या आदेशाचा सन्मान राखला.
नाना काटे यांनी शंकर जगताप यांना पाठींबा दिल्यानंतर चिंचवड विधानसभा मतदार संघात विजय ऐक्याचा विक्रमी मताधिक्याचा पाहायला मिळेल, असे नाना काटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

त्यामुळे नाना काटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची संपूर्ण टीम शंकर जगताप यांच्या प्रचारात आघाडीवर होती. नाना काटे शंकर जगताप यांच्या विजयाचे किंगमेकर आहेत, असे विश्लेषण केल्यास वावगे ठरणार नाही.

हे ही वाचा :

NFC न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स भरती, आजच अर्ज करा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हीच कष्टकऱ्यांची इच्छा : बाबा कांबळे

पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला; बसमधील 38 जणांचा मृत्यू, 20 पेक्षा जास्त जण जखमी

Tarkarli beach : तारकर्ली एक नयनरम्य पिकनिक स्पॉट (Video)

संबंधित लेख

लोकप्रिय