Manchar : साथी संस्था पुणे यांच्या पुढाकाराने व आदिम संस्कृती अभ्यास संशोधन व मानव विकास केंद्र केंद्र, आंबेगाव च्या स्थानिक संयोजनातून तालुका आरोग्य विभाग व आयसीडीएस विभाग आंबेगावच्या सोबतीने ‘आरोग्यसेवेतील लोकसहभाग: JAS-HWC बळकटीकरण प्रक्रिया’ तालुक्यात राबवली आहे.
या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीच्या सदस्यांसाठी व लोकप्रतिनिधी यांच्या प्रशिक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेसाठी जन आरोग्य समिती सदस्य, स्थानिक सरकारी अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि समुदाय सदस्यांसह प्रमुख लोकप्रतिनिधी, सरपंच यांचा सक्रिय सहभाग होता.
साथी संस्थेचे शैलेश डीखळे यांनी आपल्या मांडणीत तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी जन आरोग्य समितीची रचना, कार्ये आणि भूमिका याची माहिती दिली. संक्रमक रोग, माता आणि बाल आरोग्य समस्या आणि मानसिक आरोग्य यासह प्राथमिक आरोग्य आव्हाने सोडवण्यासाठी आरोग्य वर्धिनी उपकेंद्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा बचुटे यांनी मर्यादित निधी असूनही प्राथमिक आरोग्य केंद्र, अवसरी खुर्द चांगल्या सेवा देऊ शकले. आरोग्य सेवा टिकवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायती आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी बहुमोल योगदान दिले आहे, हेही यावेळी त्यांनी मांडले. ते म्हटले कि व्यवस्था सुरळीत आणि उत्तरदायी बनण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे.
सरपंच वैभव वायाळ आणि उपसरपंच विनायक गावडे यांनी या संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातील आरोग्य कार्यक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आणि स्थानिक आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली. अ संसर्गजन्य रोग (NCD) तपासणी शिबिरे आणि आरोग्य सेवा यासाठी पाठपुरावा, उपक्रम आयोजित करण्याचा संकल्प करून कार्यशाळेचा समारोप झाला.
या कार्यशाळेत डॉ. रेश्मा बचुटे (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र,अवसरी खुर्द), डॉ.याज्ञिक रणखांब (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र,अवसरी खुर्द), डॉ.ज्योती निकम (वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक, प्राथमिक आरोग्य केंद्र,अवसरी खुर्द), वैभव वायाळ (सरपंच, अवसरी खुर्द), शैलेश डीखळे (साथी संस्था, पुणे), सारिका हिंगे (सरपंच, अवसरी बुद्रुक), विनायक गावडे (उपसरपंच, गावडेवाडी), आरोग्य वर्धिनी उपकेंद्र अवसरी बुद्रुक,गावडेवाडी, अवसरी खुर्द येथील जन आरोग्य समितीत्यांचे सदस्य, सरपंच, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, यांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक साथी संस्थेचे समीर गारे यांनी तर सूत्रसंचालन दिनेश वालकोळी यांनी केले.
Manchar
हेही वाचा :
IITM : पुणे येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत विविध पदांची भरती
SIDBI भारतीय लघुउद्योग विकास बँक भरती 2024
SCI Bharti : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती