Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : शाहू महाराज शाळेत संविधान दिनानिमित्त स्पर्धा

PCMC : शाहू महाराज शाळेत संविधान दिनानिमित्त स्पर्धा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – शरद नगर, चिखली येथील बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये आज संविधान दिन साजरा करण्यात आला. (PCMC)

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून सचिव एल.एस. कांबळे, प्रमिथ फाउंडेशनचे योगेश गोरटे सामाजिक कार्यकर्ते पांडा साने, स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना सोनार, शिवाजी घोडे, किशोर मराठे, सोमनाथ थोरात उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष गायकवाड यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषण, गीत आणि शायरीच्या माध्यमातून भारतीय संविधानाची महती सांगितली. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने विद्यालयांमध्ये रांगोळी, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे पारितोषिक देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वाती पाटील, संतोष घरडे,सुजाता जोगदंड, कोमल गायकवाड, पुनम तारख, जितेंद्र सूर्यवंशी, किशोर बडे, व्होनमाने योगिता, अमोल सूर्यवंशी, प्रमोद रायकर, धुडकू कुवर, स्वप्निल पठारे यांनी विशेष परिश्रम घेतले. (PCMC)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद डोंगरदिवे यांनी केले तसेच आभार रूपाली पवार यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

PCMC : औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग

Cold wave : महाराष्ट्रात थंडीची लाट, पुणे 9.9°C

PCMC : भारतीय संविधान हा मानवतेचा जाहिरनामा; महापालिका आयोजित परिसंवादात वक्त्यांचा सूर

PCMC : लेवा भ्रातृ मंडळाच्या वतीने डिजिटल संस्कार शिबिराचे आयोजन

SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024

IITM : पुणे येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत विविध पदांची भरती

SIDBI भारतीय लघुउद्योग विकास बँक भरती 2024

SCI Bharti : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती

संबंधित लेख

लोकप्रिय