Saturday, October 12, 2024
Homeक्रीडाविश्वमहाराष्ट्रातील 'या' फुटबॉलपटूची भारतीय फुटबॉल संघात निवड !

महाराष्ट्रातील ‘या’ फुटबॉलपटूची भारतीय फुटबॉल संघात निवड !

कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉलपटू अनिकेत जाधव (Aniket Jadhav) याची भारतीय फुटबॉल (indian football team) संघात निवड झाली आहे. अनिकेतच्या निवडीने काेल्हापूराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा राेवला गेला आहे.

संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे २३ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत आशियाई फुटबाॅल स्पर्धा (AFC U-23 Asian Cup) हाेईल. या स्पर्धेसाठी अनिकेतची संभाव्य भारतीय संघात निवड झाली आहे.

यापुर्वी अनिकेतने १७ वर्षांखालील गटात विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या अनिकेत इंडियन सुपर लीग स्पर्धेत हैदराबाद एफसी संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. दरम्यान फुटबॉल खेळाचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी (sports) अनिकेतची निवड अभिमानास्पद ठरली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय