Wednesday, September 18, 2024
Homeराज्यनंदी दुध पित असल्याच्या अफवेने राज्यभर मंदिरात उसळली गर्दी, अंनिसने सांगितले "हे"...

नंदी दुध पित असल्याच्या अफवेने राज्यभर मंदिरात उसळली गर्दी, अंनिसने सांगितले “हे” कारण

पुणे : मध्य प्रदेशाच्या आलीराजपुर येथून नंदी दूध पित असल्याच्या अफवा आता महाराष्ट्रात पोहोचल्या आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात नंदी दूध पित असल्याच्या अफवा वाऱ्या सारख्या पसरल्यानंतर अनेक ठिकाणी नागरिक मंदिरात जाऊन नंदीला दूध पाजत असल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी नागरिकांनी मंदिराबाहेर प्रचंड गर्दी केली. तर काही ठिकाणी नंदीला दूध पाजण्यासाठी नागरिकांनी मंदिराबाहेर रांगा लावल्या.

नंदी दुध पित असल्याच्या अफवेने राज्यभर मंदिरात उसळली गर्दी, अंनिसने सांगितले “हे” कारण

औरंगाबाद, धुळे, जालना, पुणे, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अमरावती, वाशिमध्ये या अफवा पसरल्या आहेत. तर मलकापूरमध्ये नंदी दूध पीत असल्याचं माहित होताच मंदिरात भजन किर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. 

दरम्यान, नंदी दूध पित असल्याच्या अफवांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

अंनिसने म्हटले आहे कि, कोणतीही निर्जीव वस्तू पाणी पीत नाही हे वैज्ञानिक सत्य आहे. नंदीची मूर्ती पाणी खेचते ते केवळ पृष्ठीय ताण किंवा सरफेस टेन्शन आणि केशकर्षण या वैज्ञानिक तत्त्वामुळे. समान गुणधर्म असलेले द्रवपदार्थ जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा पदार्थाच्या थेंबाच्या वरच्या बाजूला अणुरेणूचा असलेला पृष्ठीय थर हा दुसऱ्या त्याच गुणधर्माच्या थेंबाला स्पर्श केला असता खेचला जातो. विज्ञानाच्या भाषेत याला सरफेस टेन्शन किंवा पृष्ठीय ताण असे म्हटले जाते. अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत असल्याचे संघटनेचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे म्हणाले.

महाराष्ट्रातील अनिकेत जाधव याची फुटबॉलपटूची भारतीय फुटबॉल संघात निवड !

संबंधित लेख

लोकप्रिय