Wednesday, February 19, 2025

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज पुणे मेट्रोचे उद्घाटन, “असे” असतील तिकीट दर

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अखेर पुणेकरांसाठी मेट्रो सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यांवर असून त्यांच्या हस्ते या मेट्रो रेल्वेचा लोकार्पण करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही ते करणार आहेत. या सोबतच पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. हा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे.

आज पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी स्थानक मेट्रोसेवा सुरू करण्यात येणार आहे. मेट्रो ही सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मेट्रोचे दरपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. कमीत कमी मेट्रो प्रवासासाठी पुणेकरांना 10 रुपये मोजावे लागणार आहे. पिंपरी चिंचवड पालिका ते फुगेवाडीसाठी 20 रुपये मोजावे लागणार आहे. तर गरवारे कॉलेज ते वनाजपर्यंत 20 रुपये तिकीट आकारले जाणार आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles