Friday, April 26, 2024
Homeजुन्नरजुन्नर : कर्जवसुलीच्या वाहनावर 'महाराष्ट्र शासन'चा फलक, गुन्हा दाखल

जुन्नर : कर्जवसुलीच्या वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’चा फलक, गुन्हा दाखल

जुन्नर / पौर्णिमा बुचके : पतसंस्थेच्या खासगी वाहनावर वसुली अधिकाऱ्याने ‘महाराष्ट्र ‘शासन’ अशी पाटी लावून थकीत कर्ज भरण्यासाठी कर्जदारांना दमदाटी व धमकी दिली. या कारणावरून जुन्नर न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची फिर्याद बाळासाहेब ज्ञानदेव कोंडे (रा. धामणखेल, ता. जुन्नर) यांनी जुन्नर न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने ३ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशान्वये जुन्नर पोलिस ठाण्यात वाशी (नवी मुंबई) येथील कुलस्वामिनी को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या जुन्नर शाखेच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.

कोंडे यांच्या फिर्यादीत संस्थेच्या खासगी वाहनावर (क्र. एमएच १४ जीएस ९५०५) ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावून थकीत कर्ज रक्कम भरावे, यासाठी कर्जदारांना व फिर्यादी कोंडे यांना शिवीगाळ व दमदाटी करून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. कोंडे हे एका कर्ज प्रकरणात जामीनदार असल्याने त्या कर्जदाराची थकीत कर्ज रक्कम भरण्यासाठी वसुली अधिकारी त्यांच्या घरासमोर ५ फेब्रुवारी रोजी आले होते, त्यावेळी ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय