Friday, March 29, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकर्म योगाचा संदेश देणाऱ्या संत सावता महाराज यांचा संदेश विद्यार्थ्यांनी जोपासावा -...

कर्म योगाचा संदेश देणाऱ्या संत सावता महाराज यांचा संदेश विद्यार्थ्यांनी जोपासावा – कल्याण आखाडे

पिंपरी चिंचवड : संतश्रेष्ठ सावता महाराज यांच्या श्री श्रेत्र अरण गावच्या विकासासाठी समाजाने जागृत होऊन पुढाकार घेतला पाहिजे. तसेच सर्व संताच्या पालख्या पंढरपूरला जातात परंतु पंढरपूरच्या विठूरायाची पालखी संत सावता महाराजांच्या गावी अरणला येते. कर्म योगाचा संदेश देणाऱ्या संत सावता महाराज यांचा संदेश विद्यार्थ्यांनी जोपासावा, या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे प्रतिपादन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केले.

महात्मा जोतिबा फुले मंडळ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम नुकताच प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त रविराज इळवे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले. याप्रसंगी चित्रपट निर्माते आप्पा बोराटे यांना त्यांच्या आध्यात्मिक, कृषी व सामाजिक कार्यासाठी सावता भूषण तर डॉ.धनंजय वर्णेकर व शीतल वर्णेकर यांच्या शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यासाठी फुले दांम्पत्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या वेळी राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना व दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व शालेय बॅग देऊन गौरविण्यात आले. मंडळांचे वतीने महिलांसाठी आरोग्य शिबीर आयोजित केले होते. त्यामध्ये महिलांनी मोठा सहभाग नोंदवला. कार्यक्रमासाठी माजी महापौर अपर्णा डोके, राहुल जाधव, जेष्ठ नेते वसंत लोंढे, माजी सभापती संतोष लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक वसंत बोराट, माजी नगरसेविका संगीताताई ताम्हाणे, रेखाताई दर्शले, भारतीताई फरांदे, दिशा सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र कर्पे आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष हणमंत माळी यांनी केले अहवाल वाचन सुर्यकांत ताम्हाणे यांनी तर आभार महादेव महाराज भुजबळ यांनी मानले. सूत्रसंचालन ऋतुजा चव्हाण व डॉ.पोर्णिमा कोल्हे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वास राऊत, अनिल साळुंके, राजेंद्र बरके, नरहरी शेवते, अमर ताजणे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय