Friday, April 26, 2024
Homeराज्यसर्वात मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस नाहीतर "हे" होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री,...

सर्वात मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस नाहीतर “हे” होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, आज होणार शपथविधी 

Maharashtra Government Formation : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला होता. आज भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली.

यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली आहे. आज सायंकाळी ७.३० वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा शपथ विधी होणार आहे.

पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.

एकनाथ शिंदे म्हणाले की, संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.

भाजप आणि शिवसेना सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील. तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेटमध्येही नसणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या नव्या सरकारचा रिमोट कंट्रोल हा फडणवीसांकडे असणार आहे हे आता निश्चित झालं आहे. भाजपचं संख्याबळ हे मोठं असल्याने फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असे सर्वांनाच वाटले होते. मात्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय