Tuesday, May 7, 2024
HomeNewsएकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या दहा दिवसानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना स्मरून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर उपस्थितांनी बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. तसेच त्यांनी जनतेचेही आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिंदे यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. त्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ठाकरेंच्या राजीमान्यामुळं आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटानं भाजपाशी बोलणी सुरु होती. आज अखेर हा शपथविधी राजभवणात पार पडला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय