Saturday, April 27, 2024
Homeराजकारणनव्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी राज्यपाल कोश्यारी यांनी बोलावले विशेष अधिवेशन

नव्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी राज्यपाल कोश्यारी यांनी बोलावले विशेष अधिवेशन

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या दहा दिवसानंतर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हा शपथविधी सोहळा राजभवनात संपन्न झाला. आता नव्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. महाराष्ट्र विधीमंडळाचे हे विशेष अधिवेशन 2 आणि ३ जुलै होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले आहे. या बहुमत चाचणीद्वारे विद्यमान सरकारकडे बहुमताचा आकडा आहे की नाही हे पाहिले जाणार आहे. राज्याच्या विधानसभेत 288 आमदार आहेत. त्यामुळे बहुमतासाठी 144 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विधानसभा अध्यक्षपद भाजपकडे राहणार आहे.

राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले असले तरी या प्रक्रियेत राज्यपालांचा हस्तक्षेप नसतो. बहुमत चाचणी ही पारदर्शक प्रक्रिया आहे. यासाठी आमदारांना हजर राहुन सर्वांसमोर मतदान करावं लागलं. बहुमत चाचणीसाठी आवाजी पद्धतीने, शीरगणतीने, हात उंचावून किंवा गुप्त पद्धतीने मतदान घेतलं जातं. मतदान कोणत्या पद्धतीने घ्यायचं हा निर्णय राज्यपालांचा असतो.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय