Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसलग 5 दिवस महाराष्ट्र चिंब भिजनार !

सलग 5 दिवस महाराष्ट्र चिंब भिजनार !

पुणे : बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसाचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे. पावसाने दडी मारल्याने बळीराजासमोर मोठं संकट उभं राहिलं होतं. हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण -पश्चिम मान्सून या आठवड्यात पुन्हा सक्रिय होऊ शकतो आणि देशाच्या मध्य तसेच दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. डिजीटल माध्यमांशी संवाद साधताना भारतीय हवामान खात्याच्या विभागाचे संचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की सप्टेंबरमध्ये सामान्य पाऊस होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात बरसणार आहे. सप्टेंबर या सत्रात नोंदला गेलेला ऑगस्टमध्ये पाऊस कमी राहण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे भूमध्यरेखीय प्रशांत महासागरात अलनिनोचा परिणाम आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर पाहायला मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच २१ जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशाराही देण्यात आला आहे.

हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी नुकतेच महाराष्ट्राच्या हवामानाबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पुढील चार- पाच दिवस राज्यात मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे मुख्यतः मेघगर्जना सरींशी संबंधित असेल, अशी त्यांनी माहिती दिली. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांत पुढील 5 दिवस पाऊस पडणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय