Sunday, May 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवडमुखवाडी विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्त महापूजा

वडमुखवाडी विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्त महापूजा

आळंदी / अर्जुन मेदनकर : आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर, ॲड. मयूर तापकीर, कीर्ती तापकीर, काळुराम तापकीर, माऊली तापकीर, मारुती तापकीर, सुनील तापकीर, साधना तापकीर, अरुणा तापकीर, सरस्वती तापकीर यांचेसह तापकीर परिवाराच्या वतीने प्रथा परंपरांचे पालन करीत श्री पांडुरंगाची महापूजा करण्यात आली.

यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी माता मूर्तीची महापूजा अभिषेक हरिनाम गजरात करण्यात आला. कार्तिकी एकादशी निमित्त श्रींचे मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत दही, दूध, मधाचा, सुगंधित अभिषेक करण्यात आला. श्री पांडुरंग, श्री रुक्मिणी माता यांचे वैभवी मूर्तीची महापूजा उत्साहात करण्यात आली. यावेळी काकडा आरतीचे दैनंदिन सेवेकरी पंडित महाराज तापकीर, गणेश महाराज तापकीर, राजाराम महाराज तापकीर, भानुदास महाराज तापकीर, विणेकरी शंकर गिलबिले आदीसह श्री विठ्ठल भक्त भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. या निमित्त परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनास उपस्थित होते. महापूजा नंतर श्रींना महाप्रसाद नैवेद्य वाढविण्यात आला. भाविकांना कार्तिकी एकादशी निमित्त फराळ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

शुक्रवार १ डिसेंबर २०२३ रोजी ॲड. कृष्णा महाराज चौरे ( पंढरपूर ) यांचे सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे. त्या नंतर महाप्रसाद वाटप ग्रामस्थांचे वतीने होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या सेवेचा लाभ घेण्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन ॲड.विष्णू तापकीर यांनी केले आहे.

Mahaegs Maharashtra Recruitment
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय