Friday, November 22, 2024
Homeजिल्हामहसूल मंत्र्यांच्या घरावर २६ एप्रिलपासून लाँग मार्च, देवस्थान शेतकरी मेळाव्यात घोषणा

महसूल मंत्र्यांच्या घरावर २६ एप्रिलपासून लाँग मार्च, देवस्थान शेतकरी मेळाव्यात घोषणा

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने देवस्थानाची जमीन कसणाऱ्याच्या नावे करणारा कायदा करण्याचा आदेश केला आहे. त्या नुसार महसूल खात्याचे कायद्याचा मसुदा मंत्रिमंडळापुढे ठेवावा. या मागणीसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी (जि.अहमदनगर) येथील राहत्या घरावर लॉंग मार्च काढण्याची येणार असल्याची घोषणा किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख यांनी बुधवारी कोल्हापुरात केली. 

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील देवस्थान शेतकऱ्यांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉक्टर उदय नारकर होते. मेळाव्याला जिल्ह्यातील देवस्थान शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

कोल्हापुरातून मंगळवार दिनांक २५ एप्रिलला सकाळी ११ वाजता दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे. लॉंग मार्च यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मिळावे घेणार असल्याचे किसान सभेचे जिल्हा सचिव अमोल नाईक यांनी सांगितले.

किसान सभेने आयोजित केलेल्या नाशिक ते मुंबई लॉंग मार्च शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, व विविध खात्याच्या सचिवांशी झालेल्या  चर्चेत हे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. तसे लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत करून त्यानंतर तो शासन आदेशही जारी केला. त्यानुसार कार्यवाही करावी. त्यासाठी किसान सभेच्या वतीने अकोले अहमदनगर ते लोणी असा लॉंग मार्च २६ ते २८ एप्रिल दरम्यान काढण्यात येणार आहे.

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय