Sunday, May 19, 2024
Homeजुन्नरजुन्नर : शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी राजेश दुरगुडे तर सरचिटणीसपदी राजेंद्र गारे

जुन्नर : शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी राजेश दुरगुडे तर सरचिटणीसपदी राजेंद्र गारे

जुन्नर : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे महा अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात 

मावळते अध्यक्ष बाळासाहेब लांघी यांना शिक्षक समिती भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.जुन्नर तालुका शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी राजेश दुरगुडे तर सरचिटणीस पदी राजेंद्र गारे यांची निवड करण्यात आली.

शिक्षक समितीचे भव्य महाअधिवेशन, गुणवंत शिक्षक पुरस्कार व ‘आठवणींच्या सरी’ काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे, माजी जि. प.सदस्य गुलाब पारखे, विकास राऊत, शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर, जिल्हा सरचिटणीस राजेश ढोबळे, इतर तालुक्यातील तालुका अध्यक्ष व कार्यकारणी त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व समिती शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार सोनवणे यांनी शिक्षक समिती च्या कामाचे कौतुक केले. सर्वसामान्य शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवणारी शिक्षक समिती ही प्रबळ संघटना असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांचे प्रश्न माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नेऊन सोडवले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मावळते अध्यक्ष बाळासाहेब लांघी यांच्या कामाचे विशेष कौतुक त्यांनी केले.

राज्य नेते उदय शिंदे यांनी शिक्षकांपुढील भविष्यातील आव्हाने आणि समस्या, बदली धोरण, अशैक्षणिक कामे यावर प्रकाशझोत टाकला. यावेळी जुन्नर तालुका शिक्षक समितीच्या महिला आघाडी अध्यक्षपदी स्वाती भोर, कोषाध्यक्षपदी निलेश बांगर यांची निवड करण्यात आली. 

तसेच तालुक्यातील 63 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. या अधिवेशनाला तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक बाळासाहेब लांघी यांनी केले तर शिक्षक नेते चंद्रकांत डोके, संजय रणदिवे, साहित्यिक संदीप वाघोले, ज्योती शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. शोभा ढमढेरे, विठ्ठल जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नामदेव मुंढे यांनी आभार मानले.

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय