Monday, December 9, 2024
Homeराज्य'कोर्ट' फिल्ममधील लोकशाहीर वीरा साथीदार काळाच्या पडद्याआड

‘कोर्ट’ फिल्ममधील लोकशाहीर वीरा साथीदार काळाच्या पडद्याआड

मुंबई : ज्येष्ठ विचारवंत, अभिनेते आणि लेखक म्हणून प्रसिद्ध असणारे वीरा साथीदार यांचा कोरोनामुळे आज (दि.१२ एप्रिल) मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 

वीरा साथीदार यांची ‘कोर्ट’ सिनेमातील भूमिका विशेष गाजली होती. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी सिनेमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची मोहोर उमटवली होती.

समाजाच्या प्रबोधन करिता प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला. वीरा साथीदार हे डाव्या आंदोलनातील एक दुवा होते. प्रगतिशील लेखक संघ अमरावती अधिवेशनाचे उद्घाटक अध्यक्ष पदही त्यांनी पार पाडले.


संबंधित लेख

लोकप्रिय