Monday, December 9, 2024
Homeहवामानजुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता !

जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता !

जुन्नर (पुुणे) : तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह बरसला. तर काही ठिकाणी जोराचा वारा पहायला मिळाला.

पुण्यासह राज्याच्या विविध भागांत सोमवारी पावसाने हजेरी लावली. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे या आठवड्यात उन्हाचा चटका कमी राहणार आहे. 

गेल्या २४ तासांत दक्षिण तमिळनाडू व लगतचा भाग ते दक्षिण कोकणपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मुंबई, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज (दि. १३) तालुक्याच्या कुकडी खोरे, मिना खोरे, खिरेश्वर खोऱ्यासह पुर्व पट्टयात हलक्या व मध्यमात पावसाने हजेरी लावली.

बुधवारीही पावसाचा अंदाज ! 

बुधवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आणि गुरुवारी संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय