Loksabha : लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये व्हाट्सअप, फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम आदी सर्व समाज माध्यमांमध्ये आणि जाहीर भाषणांमध्ये होणारा प्रचार सत्यापेक्षा असत्याच्या अंगाने वेग घेतो आहे. तसेच तो विषारी व विखारी होत आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झालेला असताना, संविधानाचे अमृतवर्ष सुरु असताना, अठरावी सार्वत्रिक निवडणुक होत असताना प्रचार प्रक्रियेत फेक न्युज,फेक कन्टेन्ट, डीप फेक म्हणजे खोट्या बातम्या, खोटी माहिती व आकडेवारी, अर्धसत्य, बनावट व मिश्रित चित्रफिती यांच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेतील प्रचारामध्ये अतिछद्मता येत आहे. त्याला वेळीच आवर घातली गेली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात देशाला भोगावे लागतील असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात ‘ प्रचारातील वास्तविकता व अवास्तविकता ‘या विषयावरील चर्चेतून पुढे आले. (Loksabha)
या चर्चासत्रामध्ये प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, प्रा.रमेश लवटे, तुकाराम अपराध, दयानंद लिपारे, पांडुरंग पिसे, शकील मुल्ला, रामभाऊ ठिकणे, सचिन पाटोळे शहाजी धस्ते, देवदत्त कुंभार, मनोहर जोशी आदीनी सहभाग घेतला.
या चर्चासत्रात असे मत व्यक्त करण्यात आले की, एका संगणक सुरक्षा कंपनीच्या अहवालानुसार देशातील ७५ टक्के लोकांपर्यंत समाज माध्यमांतून अशा प्रकारचा धादांत खोटी अर्थात अतिछद्म स्वरूपाची माहिती चित्रफिती, आकडेवारी, बातम्या, लेख अशा स्वरूपात पोहोचत आहे. आणि त्यांनाही असत्य आहे याची माहितीही नसते. सत्यामध्ये तथ्यामध्ये मोडतोड करून किंबहुना तथ्य हे तथ्यच नाही असे सांगण्यापर्यंत अतिछद्मची मजल गेलेली आहे.
निरनिराळ्या राजकीय पक्षांचे आयटी सेल हा खोटेपणाचा आजार खरेपणाने पसरवीत आहे. असा फेक कंटेंट, फेकूगिरी यातील सत्यता न पडताळता ती फॉरवर्ड करत राहणे योग्य नाही.कारण या साऱ्यातून एका खोटेपणाच्या भयावह गर्तेत समाज लोटला जात आहे. त्यामुळे समाज माध्यमातून फॅक्ट चेक करण्याकडेही गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकासासाठी वापर करण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे नैसर्गिक बुद्धिमत्ता विकृतीकडे नेणे फारच घातक ठरेल. या चर्चासत्रात प्रचारातील खोटेपणा, दांभिकता याची अनेक उदाहरणांसह चर्चा करण्यात आली.
हे ही वाचा :
संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
WhatsApp वर बिना इंटरनेट पाठविता येणार फाइल्स
अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली
निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !
ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह
ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल
केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!
NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त
SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता