Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याLoksabha election : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा, ‘या’ राज्यातही पोटनिवडणुका

Loksabha election : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा, ‘या’ राज्यातही पोटनिवडणुका

नवी दिल्ली : देशभरातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची (Loksabha election) घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवार 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे. याशिवाय काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानासभा निवडणुकांची घोषणा देखील करण्यात आली आहे.

देशभरातील ५४३ जागांवर लोकसभा निवडणूक (Loksabha election) पार पडणार आहे. एकुण 7 टप्प्यात लोकसभा निवडणूका होणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी सहावा टप्पा २५ मे रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

चार राज्यात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. आंध्र प्रदेश, ओडिसा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि जम्मू काश्मीर येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. महत्त्वाच्या राज्यांमध्ये पोटनिवडणुका होणं बाकी आहे. बिहार, गुजरात, हरयाणा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, झारखंड या ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत.

तसेच, महाराष्ट्रात पाच टप्प्यात सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे.

whatsapp link

हे ही वाचा

महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल एवढा मोठा बोगदा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज

संबंधित लेख

लोकप्रिय