Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : 'मनसे' चा शाखा उद्घाटनाचा धडाका : पिंपरी विधान सभा मतदार...

PCMC : ‘मनसे’ चा शाखा उद्घाटनाचा धडाका : पिंपरी विधान सभा मतदार संघात शाखेचे उद्घाटन

मनसेचे महाराष्ट्र सरचिटणीस, पिंपरी चिंचवड प्रभारी ॲड.गणेश अप्पा सातपुते यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पिंपरी चिंचवड शहरात शाखा उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी शाखांची बांधणी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने महात्मा फुले नगर, भोसरी एमआयडीसी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्‍घाटन करण्यात आले आहे. (PCMC)

शहरातील शेकडो तरुणांनी मनसेत प्रवेश करत ताकद उभी करण्याचा सपाटा लावल्याने सत्ताधाऱ्यांना धडकी भरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आगामी निवडणुकांचा मुहूर्त बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसणे सुरू केले असून निगडी, पिंपरी, काळेवाडी, वाकड पाठोपाठ आत्ता पिंपरी येथे मनसेच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

पिंपरी मधील शेकडो युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रदेश सरचिटणीस तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी ॲड.किशोर शिंदे, ॲड.गणेश अप्पा सातपुते, रणजित शिरोळे, पिंपरी चिंचवड मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, सचिव रुपेश पटेकर, उपशहर अध्यक्ष बाळा दानवले, राजु सावळे, राजु भालेराव, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, अंकुश तापकीर, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, पिंपरी चिंचवड शहराचे मनविसेचे शहराध्यक्ष अनिकेत प्रभू, नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. (PCMC)

दरम्यान, येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. त्यापाठोपाठ आता पक्ष बळकटीसाठी मनसेने सदस्य संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले आहे. असे मनसे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

यावेळी उपविभाग अध्यक्ष कृष्णा बिरूणगीकर, शाखाध्यक्ष काशिनाथ खजूरकर, उपशाखाध्यक्ष रवी कनूरकर, शाखा सचिव चंद्रकांत दोडमनी, सदस्य परशुराम बिरूणगीकर, राजू कनूरकर, खाजप्पा बाणे, अमोल गवंडी, खाजप्पा हरळय्या, राजेश दानवले, सोमनाथ स्वामी, सोमनाथ खंदारे, चंद्रकांत नागनाळकर, प्रेम पाटोळे, गणेश हरळय्या, अर्जुन भालेराव, हनुमंत नाटेकर, तुकाराम वसके, समीर शेख, सतीश दाभाडे, निलेश खिलारे, भोसरी उपविभाग अध्यक्ष तुषार सोनटक्के, अंकीत शिदे, निलेश सुर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

whatsapp link

हे ही वाचा

मोठी बातमी : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू, केल्या मोठ्या घोषणा…

मोठी बातमी : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा, ‘या’ राज्यातही पोटनिवडणुका

महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल एवढा मोठा बोगदा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय